Ads

--

औरंगाबाद संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव झाले ..

By Xtralarge News

June 30, 2022 10:06 am

Ads

औरंगाबाद संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव झाले ..

मुंबई, दि. 30 जून :
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन शहरांची नावं बोलण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.

या दोन शहरांची नावं बदलण्याची मागणी शिवसेनेची होती. शिवसेना या दोन शहरांचा उल्लेख याच नावाने करत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर नामकरणाचा निर्णय घेऊन एक भेटच दिली.

No comments to show.

Leave a Comment