उद्धव ठाकरेंनी सत्ता गमावली पण जनतेची मनं मात्र जिंकली !

0
20220630_084328

उद्धव ठाकरेंनी सत्ता गमावली पण जनतेची मनं मात्र जिंकली !

मुंबई, दि. 30 जून :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.

राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी सत्ता गमावली असली तरी जनतेची मनं मात्र जिंकली….

जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” मी आश्वस्त केले होत जे सुरु केलय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन.

अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.

न्याय देवतेने निकाल दिलाय. फल्ोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ति सुरतला गुवाहटीला जाऊन सांहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

आम्ही हपालेले होऊन जात नाही मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि मुस्लिमांनि पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल असं बोललो नव्हतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *