Ads

---

एकनाथ शिंदे यांच्याकडे ४३ आमदार?

By Xtralarge News

June 23, 2022 5:31 pm

Ads

एकनाथ शिंदे यांच्याकडे ४३ आमदार?

मुंबई, दि. २३ जून

शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एक-एक आमदार शिंदे गटाकडे जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांची संख्या वाढत आहे. शिंदे यांच्याकडे किती आमदार तर उद्धव ठाकरे यांच्याकडे किती आमदार आहेत याचे आकडे समोर येत आहेत परंतु त्यावही शंका उपस्थित केल्या जात आहेत.

गुवाहाटी येथे गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या तब्बल ४६ आमदारांची संख्या असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आलेल्या आमदारांमध्ये, अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार नबी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, सौ. लता सोनावणे, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड तसेच बच्चू कडू, राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, गीता जैन हे अपक्ष आमदारही असल्याचे शिंदे गटाना दावा केला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेच कसे, असा प्रश्नही विचारला जात आहे. शिवसेनेकडूनही या बंडखोरीवर फारशी आक्रमक प्रतिक्रिया उमटत नसल्याचे दिसत असल्याने एकनाथ शिंदे यांच्या बंडावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

No comments to show.

Leave a Comment