मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरभर मृत्यूचे सापळे

0
IMG-20220609-WA0013

मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरभर मृत्यूचे सापळे..

मुंबई, दि. 9 जून :
शहरातील धोकादायक ओव्हरहेड वायर्स आणि केबल्सपासून सुटका करून घेण्यात आपली उदासीनता झाकण्याचा महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्ष करत आहे. स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईची अवस्था बकाल मुंबई झाली असल्याची टीका आम आदमी पार्टीच्या मुंबई नेत्या ॲड. सुमित्रा श्रीवास्तव यांनी केली.

मुंबई शहरात या मोकळ्या केबल वायर संदर्भात आम आदमी पार्टीने मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील फोर्ट कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत सुमित श्रीवास्तव म्हणाल्या की, शहरातील २७ ठिकाणी १४५  ठिकाणी ओव्हरहेड केबल्स अजूनही धोकादायक आहेत. २०२० मध्ये आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेने ओव्हरहेड वायर्स आणि केबल्स काढून टाकेल असे विधान केले होते. परंतु आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची पडती बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.  कारण आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्य परिस्थिती  मुंबईकरांच्या समोर आणली आहे. शहरात अजूनही ठीक ठिकाणी मोकळ्या केबल वायर लटकलेल्या आहेत.  अनेक भागात मोकळ्या ओव्हरहेडला वायरला परवानगी दिली आहे.  मुंबई महानगरपालिका दडात्मक कारवाई करण्याची कोणतीही यंत्रणा किंवा इच्छा नसल्यामुळे आम आदमीचा नाहक बळी जात असल्याची खोचक टीका आम आदमी पार्टीच्या मुंबई नेत्या ॲड. सुमित्रा श्रीवास्तव यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार सर्व वायर्स आणि केबल्स भूमिगत होणे आवश्यक आहे. असे असूनही, आम्ही त्या विजेचे खांब आणि झाडांवरून मोकळ्या सोडलेल्या पाहायला मिळतात. अलीकडे आम आदमी पार्टीच्या दबावानंतर मुंबई महानगरपालिकेने या वायरींच्या विरोधात मोहीम राबविली पण फक्त झाडांवर परंतु ती देखील यशस्वी झाली नाही. या वायरी प्रकाशाच्या खांबावर आणि झाडांना वजन वाढवतात ज्यामुळे ते कोसळतात आणि मुंबई नागरिकांचा जीव धोक्यात असल्याची खंत आम आदमी पार्टीचे मुंबई चे नेते व रिवर मॅन म्हणून ओळखले जाणारे गोपल झवेरी यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना गोपाल झवेरी म्हणाले की, अनियंत्रित केबल मुंबईकरांसाठी धोकादायक आहेत. २०१२ मध्ये  वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका २७ वर्षांच्या दुचाकी स्वाराला ओव्हरहेड मेटल केबल तुटून त्याचा गळा चिरून आपला जीव गमवावा लागला होता. २०१९ मध्ये महालक्ष्मी आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान पश्चिम मार्गावरील ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) वर केबल पडल्याची घटना घडली होती. महानगरपालिका पुन्हा त्याची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहते आहे का? प्रश्न गोपाल झवेरी यांनी उपस्थित केला.

मुंबई महानगरपालिकेने मोकळ्या केबल वायरवर तात्काळ कारवाई करावी आणि ओव्हरहेड वायर्स आणि केबल्स काढून टाकावीत अशी मागणी पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीच्या मुंबईच्या नेत्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *