Ads

-

महामार्गावर पावसाळ्यात गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या !

By Xtralarge News

June 7, 2022 5:30 pm

Ads

महामार्गावर पावसाळ्यात गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या !

मुंबई, दि. ७ जून :
नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुर्दशा होत असते. या मार्गावरील रस्ते निकृष्ठ असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ गोंडे ते वडपे आणी वडपे ते ठाणे या रस्त्याची दुरावस्था,वाहतुकीची कोंडीच्या उपाय योजनांबाबत ही बैठक आयोजित केली होती.

भुजबळ म्हणाले, सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा. वडपे ते ठाणे या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना तात्काळी गती द्यावी.वारंवार खराब होणा-या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे.जेणेकरून वाहतूक विनाअडथळा वाहतुक कोंडीशिवाय सुरळीत सुरू राहील.आगामी दहा वर्षात होणारे रस्ते तसेच या परिसरातून करण्यात येणा-या रस्त्यांचे नियोजन देखील सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आत्तापासून करावे जेणेकरून या परिसरातून होणा-या वाहतूकीचे नियोजन सुयोग्य रित्या करता येईल

खड्ड्यांमुळे या महामार्गावर पावसाळ्यात मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांसाठी सबंधित यंत्रणांनी तयारी ठेवावी या रस्त्यावर खड्डे पडणार नाही याची खबदारी घ्यावी असे निर्देश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

No comments to show.

Leave a Comment