मुंबईला मोकळा श्वास देण्यासाठी ‘हरित मुंबई’चा संकल्प

0
20220605_145653

मुंबईला मोकळा श्वास देण्यासाठी ‘हरित मुंबई’चा संकल्प.

मुंबई, दि. 5 जून :
मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅनअंतर्गत ‘मुंबई हरित योद्धा’ हा उपक्रम राबवला जात आहे. मुंबईत ग्रीन स्पेस निर्माण करताना इथले तापमान, पूरस्थिती आटोक्यात आणून ‘इझ ऑफ लिव्हिंग’साठी सरकार प्रयत्न करत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘मुंबई हरित योद्धा’ या कार्यक्रमात मुंबईकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

‘मुंबई हरित योद्ध’ उपक्रमाचं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी  या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं . यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मंत्री महोदयानी प्रतिपादन केलं. मुंबईला मोकळा श्वास देण्यासाठी हरित मुंबईचा संकल्प सरकारने केला आहे . त्या अंतर्गत मुंबईत सध्या असलेल्या झाडांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याचा निर्धार आहे . २०२० मध्ये पालिकेच्या एकट्या के पश्चिम विभागात ६५ हजार झाडं लावली असून येत्या काळात इथे आणखी अडीच हजार झाडं लावण्याचा सरकारचा मानस आहे . त्याच बरोबर शहरात स्वच्छता मोहिमेसोबतचं नवी रोपटी देखील लावली जाणार आहेत . मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे , या रस्त्यालगत किती कार्बन उत्सर्जित होईल त्याची पाहणी करून तेवढी झाडं लावली जाणार असून इतरही मुंबईतल्या प्रमुख ५ रस्त्यालगत झाडं लावण्याचा सरकारचा निर्धार आहे.

या कार्यक्रमात भाषणादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मुंबईकरांना आवाहन केलंय . त्याच बरोबर हरित ऊर्जा निर्मिती बरोबरच विमानातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर काम करून हरित धोरण अवलंबन्याचे आवाहन केले. प्रत्येक विमानाच्या प्रवासाबरोबर कार्बन किती उत्सर्जित होते आणि त्या तुलनेत किती झाडे लावली पाहिजेत याचा आराखडा तयार केला पाहिजे आणि तशी झाडे लावली पाहिजेत , असं आवाहन देखील अदानी समूहाला कार्यक्रमादरम्यान उपस्थित असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय .

मुंबईत ८५०० इलेक्ट्रिक कार चार्जिंग सेंटर उभी करण्यासाठी अदानी ग्रुप प्रयत्न करणार असून यासाठी सर्व हौसिंग सोसायटी मधील कचरा एकत्र करून त्यात विज निर्माण करून इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट तयार केली जातील , हे आपलं पुढचं पाऊल आहे, असे ठाकरे यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *