Ads

-

अभिनेत्री राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन…

By Xtralarge News

May 31, 2022 6:22 pm

Ads

अभिनेत्री राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन…

मुंबई, दि. 31 मे :
अभिनेत्री राणी मुखर्जी हिने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी राणीला बाप्पाची शाल देऊन स्वागत केले.

आगामी प्रदर्शित होऊ घातलेल्या चित्रपटाअगोदर राणी मुखर्जीने श्रद्धास्थान असलेल्या सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. मंदिर न्यासाचे विश्वस्त श्री राजाराम देशमुख व राणी मुखर्जी यांनी चित्रपटांविषयी गप्पा मारल्या.  देशमुख यांनी राणी मुखर्जीच्या आगामी चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या.

राणी मुखर्जी हिने 1997 साली ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने गुलाम, कुछ कुछ होता है यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला.

No comments to show.

Leave a Comment