मुंबई, दि. १२ ऑगस्ट
सुष्मिता सेन म्हटले की डोळ्यासमोर येते ती विश्वसुंदरीचा किताब पटकावलेली, मैं हूँ ना मधली मॅडम, बीबी नंतर वन मध्ये सलमानला मेरा बच्चा म्हणून गालगुच्चे घेणारी. सुष्मिताने आपल्या अदांनी करोडो चाहत्यांना घायाळ केले. फिटनेसच्या बाबतीत तर ती फारच चौकस असून बॉलिवूडमधील फीट सेलिब्रिटींपैकी ती एक आहे. ‘सिर्फ तुम’ ‘फिलहाल’ मैने प्यार क्यूँ किया, हिंदुस्तान की कसम, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, आंखे, डु नॉट डिस्टर्ब, दुल्हा मिल गया, असे एक से बढकर एक हिट चित्रपट तीने दिले.

चित्रपटाशिवाय ती इतर इव्हेंटमध्येही दिसायची. जियेंगे तो अपने स्टाईल मे, ही तीची खासीयत. तीने लग्न केले नाही पण दोन मुलींना दत्तक घेतले. बॉयफ्रेंडवरूनही ती अनेकदा चर्चेत असते. अशी नेहमी चर्चेत राहणारी सुश्मिता मात्र मागील काही वर्षांपासून दिसली नाही. या दरम्यानच्या काळात ती काय करत होती. हे तीनेच एका मुलाखतीत सांगितले. सुश्मिता ही मरणाच्या दारातून परत आली आहे. २०१४ मध्ये ‘निरबाक’ या बंगाली चित्रपटाच्या शूटींग दरम्यान सुष्मिता खूप आजारी पडली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता सुष्मिताच्या शरिरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन तयार होत नाहीत असे समजले. या हार्मोनच्या अभावामुळे शरीरातील अवयव हळूहळू निकामी होत जातात. या आजारातून वाचण्यासाठी तिला दर आठ तासांनी स्टेरॉईड घ्यावे लागत होते.

या आजारपणानंतर पुढची २-३ वर्ष तीला खूप त्रासदायक गेली. ती फक्त एक जिवंत पुतळा झाली होती. केस गळणे, वजन झपाट्याने वाढू लागले होते. पण तीने हार मानली नाही. आजाराने खचून न जाता त्याच्याशी दोन हात केले. उपचाराबरोबरच योगा व व्यायाम तीने सुरु केला. त्यानंतर २०१६ मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या टेस्ट केल्यानंतर सुश्मिताचे स्टेरॉईड बंद करण्यात आले आणि तीच्या शरीरात पुन्हा एकदा कोर्टिसोल बनणे सुरू झाले.

आता सुष्मिता फिट असून एका वेब सिरिजमधून ती कमबॅक करतेय.
Leave a Comment