उघडी मॅनहोल मुंबईकरांच्या मृत्यूचा सापळा !

0
AAP Mumbai

उघडी मॅनहोल मुंबईकरांच्या मृत्यूचा सापळा !

मुंबई, दि. ३० मे:

आम आदमी पार्टीच्या सर्वेक्षणामध्ये मुंबई शहरात १०० हून अधिक ठिकाणी नाल्यांची उघडे मॅनहोल सापडले आहेत. अतिवृष्टी आणि पाणी साचल्यामुळे सदर उघडे मॅनहोल्स मुंबईकरांसाठी अत्यंत धोकादायक आहेत. पावसाळ्यात उघडे मॅनहोल्स हे अक्षरशः मृत्यूचा सापळाच बनतात असा आरोप आमद आदमी पक्षाने केला आहे.

दरवर्षी नागरिकांना या धोक्याचा सामना करावा लागतो ज्यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. निष्काळजीपणा जीवघेणा सिद्ध झाल्यावरच बीएमसी कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासन म्हणून उघड्या मॅनहोल्ससाठी बीएमसी जबाबदार असून पावसाळ्यापूर्वी सदरचे उघडे मॅनहोल्स लवकरात लवकर बंद करून मुंबईकरांचे प्राण वाचवावे या दृष्टीने आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शहराच्या विविध ठिकाणी सर्वेक्षण केले. सर्वेक्षणामध्ये आढळल्याप्रमाणे शहरातील नऊ प्रभागांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी मोठ मोठे मॅनहोल्स बंदच केलेले नाहीत. पावसाळा अत्यंत जवळ येवून ठेपला तरीही अजूनपर्यंत मॅनहोल्स उघडे असल्याबबत चिंता व्यक्त करत महापालिकेने आठवडाभरात सर्व उघडे मॅनहोल दुरुस्त करून झाकावेत आणि त्याची प्रत्यक्ष माहिती देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

आम आदमी पार्टीला ९ प्रशासकीय प्रभागांमध्ये पसरलेल्या शहरात १०९ उघडे मॅनहोल सापडले आहेत. यापैकी अनेक मॅनहोल्सच्या आजूबाजूला कोणतीही चेतावणी चिन्हे देखील नाहीत, ज्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. जर आम आदमी पार्टी १०० हून अधिक उघड्या मॅनहोल्सचा मागोवा घेऊ शकत असेल तर महानगरपालिका आपल्या प्रचंड बजेट आणि साधनसामग्रीने ते का करू शकत नाही?

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही बीएमसी दरवर्षी या समस्येचा मागोवा घेण्यात आणि निराकरण करण्यात इतकी वर्षे अपयशी ठरली आहे. २०१७ मध्ये मुंबईतील डॉक्टर दीपक अमरापूरकर यांना त्यांच्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून जीव गमवावा लागला होता. अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतर २ दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्यापुढील दोन वर्षांत पुन्हा चेंबूर आणि धारावीमध्येही २ आणि ७ वर्षांच्या मुलांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. आणि गेल्या वर्षीही भांडुपमध्ये दोन महिला उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुदैवाने दोन्ही महिला थोडक्यात बचावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *