वाल्मिकी नगरच्या रहिवाश्यांना मिळाले हक्काचे घर
वाल्मिकी नगरच्या रहिवाश्यांना मिळाले हक्काचे घर…
मुंबई, दि. २० मे :
विलेपार्ले येथील वाल्मिकी नगर येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने नागरिकांचे पुनर्वसन नकरता घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली. २४ तासाच्या आत घरांवर एमएमआरडीएने बुलडोझर फिरवण्यात येणार असल्याची नोटीस आल्याचे कळताच आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्या हक्कासाठी रत्यावर उतरून न्याय मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले असल्याची माहिती आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी दिली.

वाल्मिकी नगर येथील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन बांद्रा- कुर्ला संकुल येथे असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह आयुक्त राहुल कर्डिले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह आयुक्त राहुल कर्डिले यांनी घरांवर कारवाई करण्यात येणार नसून तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचे प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.

आम आदमी पार्टी आणि विमानतळ परिसरातील रहिवाशांचा आज मोठा विजय. MMRDA द्वारे वाल्मिकी नगरमधील घरे पाडण्याची कारवाई थांबवून रहिवाशांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्यात आले. मुंबई विमानतळाच्या आसपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये ८०,००० लोक राहतात. या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु भ्रष्ट सरकारी अधिकारी, राजकारणी आणि बिल्डर यांच्या संगनमताने त्यांना घरे मिळाली नाहीत आणि आज आदमी पार्टी आम आदमी साठी रस्तावर उतरली आणि रहिवाश्यांना आपल्या हक्काचे घर मिळाले.
रचना इंदुरकर उपजिल्हाधिकारी मेट्रो-मार्गिका-7A यांनी २४ तासात निष्कासन करण्यात येणार असल्याची नोटीस लावली आहे आणि त्यांनी मोजक्या रहिवाश्यांना थमकवून विद्याविहार येथे चाव्या दिल्या आहेत. परंतु विद्याविहार मध्येजी घर बांधण्यात आली त्याचे तीन मोठ्या अडचणी आहेत. लवकर पुनर्वसन करून त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले. तसेच पत्र देखील देण्यात आलेले आम आदमी पार्टीच्या यश आले असून ३३ कुटुंबीयांना त्यांना हवे ते त्याच ठिकाणी पुनर्वसन करून देण्यात आले. उर्वरित १० कुटुंबीयांना लवकरच मिळणार घर असल्याचे, प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.
