Ads

--

मुंबईच्या राजकारणात ‘आप’ एक परिवर्तनकारी शक्ती !

By Xtralarge News

May 17, 2022 12:15 pm

Ads

मुंबईच्या राजकारणात ‘आप’ एक परिवर्तनकारी शक्ती !

मुंबई, दि. 17 मे :

मुंबई महानगरपालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे मुंबईसाठी काम करू इच्छिणारे अनेक नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते आम आदमी पार्टीला  तारणहार म्हणून पाहतात. ते खरोखर आम आदमी पार्टीला मुंबईच्या राजकारणात एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून पाहतात, असे आमदार आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले आहे.

मुंबईतील विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने मुंबई अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्रीमती प्रीती शर्मा मेनन व मुंबई प्रभारी अंकुश नारंग यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीच्या मुंबईतील फोर्ट कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश केला.

धारावीतील प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील ॲड. संदीप कटके आहेत. मनसे व शिवसेनेची पार्श्वभूमी असलेल्या आकांशा जाधव आहेत. तसेच एक नाटककार ज्याने भारतातील महिला नेत्यांवर आपले काम केंद्रित केलेल्या अनामिका सिंग आहेत. तसेच राजकीय भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पक्षांची समाजात भूमिका असू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर बसपा पक्षातील ॲड. विठ्ठल अवघडे आहेत. वंचितचे राहुल मंडले, महाराष्ट्र कॉलेजचे प्राध्यापक ॲड. जमील खान, मंझर अन्सारी, आफताब आलम यांनी आम आदमी पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

अरविंद केजरीवाल आणि आप सदस्य हे भारतातील समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी काम करणारे एकमेव राजकारणी आहेत. सर्व समान विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन पक्षात सामील होणे अत्यावश्यक आहे”असे मत संदीप कटके यांनी व्यक्त केलं.

युवा नेता म्हणून मी पाहिले आहे की केवळ आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल हे तरुण भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करत आहेत, मग ते शिक्षण असो किंवा रोजगार आणि म्हणूनच मी आज ‘आप’मध्ये प्रवेश केला असल्याचे मत  आकांशा यादव यांनी व्यक्त केलं.

No comments to show.

Leave a Comment