Ads

-

शरद पवारांबद्दल गलिच्छ पोस्ट करणा-या केतकी चितळे व नितीन भावेना अटक करा

By Xtralarge News

May 15, 2022 11:31 am

Ads

शरद पवारांबद्दल गलिच्छ पोस्ट करणा-या केतकी चितळे व नितीन भावेना अटक करा..

नाशिक, दि. 15 मे :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निंदाजनक टीका करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणा-या केतकी चितळे व भावेवर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केली आहे.

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे हिने, अॅड. नितीन भावेची पोस्ट शेअर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर सोशल मिडियाद्वारे अतिशय खालच्या भाषेत निंदाजनक टीका केली आहे. या पोस्ट मध्ये शरद पवार यांच्या आजाराबाबत व व्यंगाबाबत हिणविण्यात आले असून त्यांची निंदा आणि थट्टा करण्यात आली आहे. पवार हे जेष्ठ नागरिक असून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या आजाराबद्दल त्यांना हिणवणे अतिशय निषेधार्थ आणि गंभीर आहे. सदर पोस्टवर निखिल भामरे (बागलाणकर) याने “बारामतीच्या “गांधी” साठी नथुराम गोडसे तयार करण्याची वेळ आली आहे.” अशी हत्येला प्रवृत्त करणारी पोस्ट टाकली आहे.पवार यांना जीवे मारण्याची धमकीच दिली असल्याचे म्हटले आहे.

या निंदाजनक पोस्ट व त्यावरील विविध प्रतिक्रियांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. केतकी चितळे हिच्या निंदाजनक पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ व वाद निर्माण होऊन दंगली सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.तसेच त्यांचा नथुराम गोडसे करणे म्हणजे त्यांचा खून करण्याबाबत अतिशय गंभीर आणि भडकावू वक्तव्य केले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता वरील सर्वांवर विविध कायदेशिर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments to show.

Leave a Comment