Ads

---

त्यांचे हिंदुत्व गदा नव्हे ‘गधा’धारी !

By Xtralarge News

April 27, 2022 1:48 pm

Ads

त्यांचे हिंदुत्व गदा नव्हे ‘गधा’धारी !

मुंबई, दि २७ एप्रिल:

कोणाचे हिंदुत्व श्रेष्ठ यावरून राज्यात सुरु असेलेली शिवसेना व भारतीय जनता पक्षातील वाद रंगत चालला आहे. आमचे हिंदूत्व घंटाधारी नाही तर गदाधारी आहे असे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते. आता तर ‘गदाधारी’ नावाचं नवहिंदुत्व उदयाला येत आहे. मात्र, रोज सकाळी राज्याची भीषण परिस्थिती पाहता त्यांचं हिंदुत्व ‘गदा’ नव्हे तर ‘गधा’धारी असल्याचा प्रत्यय येतो.

फडणवीस पुढे म्हणाले, २०१४ मध्ये शिवसेनेशिवाय लढायचं ठरवलं तेव्हा अमित शहा दीड महिना मुंबईत ठाण मांडून होते. त्याचाच प्रत्यय म्हणजे भाजपाने घवघवीत यश मिळवत शिवसेना मोठा भाऊ आणि भाजपा छोटा भाऊ हे मिथ्य बदलून टाकले. त्यावेळी महाराष्ट्राला मोठा भाऊ कोण हे अमित शहा यांच्यामुळेच समजले अशी खोचक टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.

No comments to show.

Leave a Comment