आम आदमी पार्टीची मुंबईत इफ्तार पार्टी !
आम आदमी पार्टीची मुंबईत इफ्तार पार्टी !
मुंबई, दि. 23 एप्रिल :
आप मुंबईच्या वतीने मुंबईतील रहिवाशांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करणे हा सन्मान होता. हा पवित्र महिना मुंबईकरांसाठी अनेक आशीर्वाद घेऊन येवो. दिल्लीप्रमाणेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही ‘आप’ ला बहुमत मिळो असा आशावाद केजरीवाल सरकारमधील मंत्री इम्रान हुसैन यांनी व्यक्त केला.

आम आदमी पार्टीने रमजान महिन्याच्या निमित्ताने मुंबई येथील हज हाऊस येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री इम्रान हुसैन यांच्या अध्यक्षतेखाली ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रिती शर्मा – मेनन तसेच आम आदमी पार्टी मुंबई सह-संयोजक किशोर मंधियान, विविध क्षेत्रातील मान्यवर, मुस्लिम समाजातील प्रमुख सदस्य हजरत मोईन मियाँ, मौलाना सय्यद नूरी यांचे प्रतिनिधी आणि मुस्लिम उलेमाचे इतर प्रमुख सदस्य उपस्थित होते.
रमझान महिन्यात आम आदमी पार्टीला मुंबईत शांतता आणि एकतेचा संदेश द्यायचा आहे. आम्ही रमजानचा पवित्र महिना पाळणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो असे आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रिती शर्मा- मेनन म्हणाल्या. तसेच आम आदमी पार्टी मुंबईच्या वतीने सर्व मुंबईकरांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देऊ इच्छितो असे आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास म्हणाले.
