Ads

-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन

By Xtralarge News

April 14, 2022 9:26 am

Ads

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन…

नाशिक, दि. 14 एप्रिल-:
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त नाशिक शहरातील शालिमार व नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रात्री १२ वाजता पुष्पहार अर्पण करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार देवयानी फरांदे,माजी आमदार वसंत गीते, शिवसेना उपनेते सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, मनपा आयुक्त रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर, डॉ.शेफाली भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे,  बाळासाहेब कर्डक, नगरसेवक गजानन शेलार, आनंद सोनवणे,  गुरुमित बग्गा, अजय बोरस्ते, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, ऍड.प्रतीक कर्डक, संजय खैरनार, अमर वझरे, धीरज बच्छाव,  ऍड.चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment