एस. टी. कर्मचाऱ्यांनी सहानभूती गमावली !
एस. टी. कर्मचाऱ्यांनी सहानभूती गमावली !
सोलापूर, दि. 9 एप्रिल:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. इथून पुढे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत देखील राज्य सरकार सकारात्मक असणार आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन राज्य सरकार करणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला मग हे आंदोलन करण्याची गरज काय असा प्रश्न देखील मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार यांनी सातत्याने बैठका घेतल्या होत्या ते कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आहेत मात्र काही मंडळीनी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही असे म्हटले आहे.
