शरद पवारांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ?
शरद पवारांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ?
मुंबई दि. ८ एप्रिल :
महाराष्ट्राचे लोकनेते शरद पवार यांच्या घरावर दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. मुंबई पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली .
जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवारांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ?
आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली आहे.
