Ads

-

ओबीसी वित्त महामंडळाच्या कर्जदारांना व्याजात सवलत !

By Xtralarge News

April 8, 2022 11:34 am

Ads

ओबीसी वित्त महामंडळाच्या कर्जदारांना व्याजात सवलत !

मुंबई,  दि. 8 एप्रिल :
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे कर्ज परतफेडीचे मुदत संपलेल्या लाभार्थ्यींकरिता संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थ्यीकरिता एकरक्कमी परतावा ( OTS) योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्ज परतफेडीचे मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून कर्ज वसूलीसाठीचे प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत. त्यासाठी ही योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

राज्यात मागील दोन वर्षांपासून उद्भवलेल्या कोविड 19 च्या गंभीर परिस्थितीमुळे बऱ्याच लाभार्थीचे व्यवसाय बंद झालेले आहेत. त्यांना अशा परिस्थितीत कर्ज परतफेड सुसह्य व्हावे व उदरनिर्वाहासाठी त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरु व्हावेत याकरीता महामंडळाने संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीकरीता एकरक्कमी परतावा (OTS) योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीला एकूण थकित कर्जातील व्याजाच्या रक्कमेल 50 टक्के इतकी भरीव सूट देण्यात येणार आहे.या  योजनेस महामंडळाच्या दिनांक १५ मार्च २०२२ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment