दिल्लीत पेट्रोल १०५ रुपये तर महाराष्ट्रात १२० रुपये का?
दिल्लीत पेट्रोल १०५ रुपये तर महाराष्ट्रात १२० रुपये का?
इंधन दरवाढीविरोधात आम आदमी पार्टीचे मुंबईत आंदोलन.
मुंबई, दि ७ एप्रिल:
कोरोनामुळे विस्कळीत झालेली सामान्य माणसाची घडी पुर्वपदावर येत असताना आम आदमीला इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे. मुंबईत पेट्रोलचे १२० रूपये तर डिझेल १०४ रुपयांवर पोहोचले आहे.दिल्लीत ‘आप’चे सरकार पेट्रोल १०५ रुपये लिटरने देऊ शकते तर महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही? महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने तात्काळ इंधन दरामध्ये समानता आणावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई प्रभारी प्रीती शर्मा- मेनन यांनी केली.

कोरोना महामारीमुळे झळ सोसत असलेले नागरिक आता इंधन दर वाढीमुळे पिचले आहेत. केंद्र सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सर्व सामान्यांच्या खिश्यावर एकप्रकारे टाकलेला हा दरोडाच आहे. केंद्र सरकारने तिजोरी भरण्यासाठी ही दरवाढ केली असल्याने केंद्रातील भाजपा सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मुंबई महानगर पालिका मुख्यालयासमोरील जंक्शनवर चक्का जाम करत रस्ता रोको करण्यात आला.
सततच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे देशातील आणि पर्यायाने मुंबईतील नागरीक त्रस्त झाले आहेत. केंद्रातील भाजपा सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील जंक्शनवर आंदोलन करण्यात आलेय यावेळी शेकडोच्या संख्येने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित राहिले. ‘मोदी सरकार हाय हाय..’च्या घोषणांनी महानगरपालिका मुख्यालयासमोरील जंक्शनचा परिसर दणादणू सोडला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारात इंधनाच्या दरावरही झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे झळ सोसत असलेले नागरिक आधीच भरडला गेला असून त्यात त्याला इंधन दरवाढीचा मारा सहन करवा लागत आहे. हा निर्लज्जपणाचा कळस असून केंद्र सरकार आपली तिजोरी भरण्याकरीता इंधन दरवाढ केली आहे. आम आदमीचे इंधन दर वाढीमुळे कंबरडं मोडल असून भाजप पक्ष आपला ‘स्थापना’ दिवस साजरा करण्यात व्यस्त आहे. भाजप सरकार वास्तवापासून खूप दूर असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास यांनी केला.
