Ads

---

पत्राचाळ घोटाळ्यातील संजय राऊतांच्या सहभागाची चौकशी करा

By Xtralarge News

April 5, 2022 7:18 pm

Ads

पत्राचाळ घोटाळ्यातील संजय राऊतांच्या सहभागाची चौकशी करा…

मुंबई, दि. ५ एप्रिल:

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्यात राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी केली.

सोमय्या यांनी सांगितले की, राऊत यांनी ८ महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रुपये भरून आपल्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आपल्यावर कारवाई होणार या भीतीने हबकलेल्या राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे सुरु केले होते. माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. राज्यसभा अध्यक्षांना पत्र पाठवून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र या दबावाला न जुमानता अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.

राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रुपये भरले तेंव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना जाब विचारायला हवा होता. मात्र तसे न करता ठाकरे सरकारने माझ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. माझ्याविरुद्ध चौकशीसाठी कितीही एसआयटी नेमा, मी घाबरत नाही, असेही डॉ. सोमय्या यांनी नमूद केले.

No comments to show.

Leave a Comment