Ads

-

अखेर गृहमंत्री वळसे पाटलांनी दिले ‘त्या’ चौकशीचे आदेश

By Xtralarge News

April 5, 2022 3:06 pm

Ads

अखेर गृहमंत्री वळसे पाटलांनी दिले ‘त्या’ चौकशीचे आदेश.

मुंबई दि. ५ एप्रिल :
केंद्रीय तपास यंत्रणांची महाविकास आघाडीच्या मंत्री व नेत्यांवर धडक करावाई करत असताना राज्यातील गृहविभाग मात्र थंडच असल्याने सर्वत्र नाराजीचा सुरु उमटत होता. गृहविभाग व गृहमंत्री वळेस पाटील यांच्या कामगिरीवर सरकारमधील मंत्री व घटक पक्षांनीही तीव्र ताशेरे ओढले. शेवटी गृहमंत्री वळसे पाटील कामाल लागले व आदेश दिले.

गृहमंत्र्यांनी आदेश दिले प्रकरण आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांचे. या प्रकरणी मुंबई पोलिसांची एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल व ही चौकशी अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीतील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. ते पुरावे राऊत यांनी पोलिसांना दिले. ह्या प्रकरणाला महिना झाली तरी गृहविभागाने त्यावर कसलीही कारवाई केली नाही. शिवसेना व मुख्यमंत्रीही यावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. शेवटी एसआयटी नेमण्याचे आदेश गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले.

भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाही, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असे राज ठाकरे यांच्या वक्तव्याच्या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment