हिंदू सणांवेळीच ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?

0
CMbjp

हिंदू सणांवेळीच ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?

मुंबई,  दि. २९ मार्च:

हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूकांना परवानगी द्या अशी मागणी विधानसभेत केली होती. परंतु आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला.

प्रसार माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणांचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो ? असा सवाल त्‍यांनी केला. पोलीसांनी मुंबईत १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्‍यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्‍ती या ड्रोन,  रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्‍ला करतील अशी माहिती पोलीसांकडे आल्‍याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्‍यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कलम लावण्‍यात आले आहे.

याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्‍हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून या दोन्‍ही सणांना परवानगी देण्‍यात याव्‍यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये आम्‍ही या मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करीत असून या उत्‍सवात भाजपा सहभागी होईल, असेही आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *