कोरोना काळात शालेय शुल्क नियामन समित्या कुठे होत्या?

0
20210915_223025

कोरोना काळात शालेय शुल्क नियामन समित्या कुठे होत्या?

मुंबई, दि. २४ मार्च:
कोरोना काळात जेव्हा शाळा बंद होत्या मात्र शाळांच्या फी वाढ होत्या. पालक आक्रोश करीत होते, आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावत होतो त्यावेळी या शुल्क नियमन समित्या काय करीत होत्या ? कुठे होत्या ? असा सवाल भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत केला.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११ मध्ये सुधारणा करणारे विधेकय आज विधानसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर बोलताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी पालकांच्या व्यथा सरकार समोर मांडल्या.

शैक्षणिक संस्थाकंडून भरमसाठ शुल्क आकररण्याच्या अनिष्ट प्रथेस व व्यापारीकरणास प्रभावीपणे आळा घालण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११ करण्यात आला. या अधिनियमानुसार विभागीय शुल्क नियामक समित्या व पुनरिक्षण समिती गटीत करण्यात येतात. या समित्यांना आतापर्यंत पगार देण्यात येत होता त्यात बदल करुन यापुढे त्यांना मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी या कायद्यात बदल करण्यात आला. यावर बोलताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, या समिती कोरोना काळात कुठे होत्या ? ज्यावेळी शाळा बंद होत्या पण फी वाढत होत्या बस बंद होत्या पण त्याचे पैसे मात्र पालकांना आकरले जात होते पालक त्रस्त होते पण त्यावेळी या समित्या काय करीत होत्या ? कोणीच काही बोलत नाही म्हणून आम्हाला न्यायालयात जावे लागले होते. मग या समित्यांना पगार तर सोडा यांना मानधन तरी कशाला देताय ? या समित्यांच्या बैठका कधी होतात? कुठे होतात? त्याचा इतिवृत्तांत सरकारकडे येतो का ? त्याबाबत सरकार काही नोंद घेते का? या सगळयांची माहिती आम्हाला द्या एकिकडे शाळा अवाजवी फी पालकांवर लादत असताना मग या समित्या काय करतात ? असा सवाल या निमित्ताने आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *