Ads

-

महाराष्ट्रातील शाळेतही भगवद्गीता शिकवा.

By Xtralarge News

March 22, 2022 5:13 pm

Ads

महाराष्ट्रातील शाळेतही भगवद्गीता शिकवा.

मुंबई, दि. २२ मार्च:

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबदद्ल केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार व्हावे यासाठी राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तकांत श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली.

मंगल प्रभात लोढा म्हणाले की, श्रीमद्भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे सार आहे. श्रीमद्भगवद्गीतेचा भारतभर शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश केला जात आहे. तसाच महाराष्ट्रात देखील श्रीमद्भगवद्गीतेचा शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करावा. अनेक राज्यांमध्ये शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारने तर  २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सहावी ते बारावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भगवद्गीता हा नैतिक मूल्यांचा ग्रंथ असल्याचे सांगून सकारात्मक संकेत दिले आहेत.

No comments to show.

Leave a Comment