Ads

--

IPL साठी स्टेडियमध्ये ५० % प्रेक्षकांना परवानगी द्या !

By Xtralarge News

March 22, 2022 11:47 am

Ads

IPL साठी स्टेडियमध्ये ५० % प्रेक्षकांना परवानगी द्या !

मुंबई, दि. २२ मार्च:
आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉन, डि.वाय पाटील या स्टेडियममध्ये २५ टक्के ऐवजी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार विभागावर चर्चा करीत असताना आशिष शेलार यांनी मुंबईती गावठाण, कोळवाडयातील प्रश्न अग्रक्रमाने मांडले. तसेच याचवेळी त्यांनी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांची लीज हे विविध विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले.

क्रिडा विभागावर बोलातना आशिष शेलार यांनी मुंबईत होणा-या आयपीएल सामन्यांबाबतच्या एका मुद्याकडे लक्ष वेधले. या सामान्यांसाठी स्टेडियमध्ये २५ टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियमची क्षमता पाहता तसेच त्यातील काही जागा शासनाला द्याव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अत्यल्प जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे एमसीएच्या वतीने याबाबत क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात येत असून शासनाने २५ टक्के ऐवजी ५० टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा.

मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान या मैदानावर नव खेळाडू तयार करण्यात येतात पण या मैदानातील खेळपट्टयांची लिज संपली असून शासनाने हे लिजचे तातडीने नुतनिकरण करावे अशी मागणी त्यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment