Ads

-

औरंगाबादमधील ‘वंदे मातरम’ सभागृहास 43 कोटी

By Xtralarge News

March 22, 2022 10:57 am

Ads

औरंगाबादमधील ‘वंदे मातरम’ सभागृहास 43 कोटी…

मुंबई, दि. 22 मार्च:

औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात सिडकोमार्फत ‘वंदे मातरम’ सभागृह होणार आहे. या सभागृहाच्या बांधकामासाठी आणि सुशोभीकरण करण्यासाठी 43 कोटी 7 लाख 86 हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता उच्च शिक्षण विभागाने दिली आहे. यामुळे वंदे मातरम सभागृहाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. याकामी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वंदे मातरम सभागृहाच्या बांधकाम, सुशोभीकरण आणि इतर कामांसाठी पूर्वी 23 कोटी 75 लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र सदर बांधकाम क्षेत्रात झालेली वाढ तसेच इतर बांधकाम खर्चात झालेली वाढ यामुळे वंदे मातरम सभागृहाचे काम पूर्ण झाले नसते. ही बाब जेव्हा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा त्यांनी उच्च शिक्षण विभागाने नवीन सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार 43 कोटी 7 लाख 86 हजार रुपये वंदे मातरम सभागृहास मिळाले आहेत.

No comments to show.

Leave a Comment