Ads

--

‘त्या’ पेन ड्राईव्हची सीआयडीमार्फत चौकशी!

By Xtralarge News

March 14, 2022 8:05 pm

Ads

‘त्या’ पेन ड्राईव्हची सीआयडीमार्फत चौकशी!

मुंबई, दि. १४ मार्च :

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. आज त्यांनी दुसरा पेन ड्राईव्ह सादर करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. फडणवीस यांच्या फेन ड्राईव्हमधील स्टिंग ऑपरेशनची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, मुंबईत १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले, त्यात अनेकांना शिक्षा झाल्या. इतके जुने प्रकरण आता सीबीआयकडे पाठवण्याची आवश्यकता नाही. आपण कोणाचीही पाठराखण करणार नाही. या घटनेच्या मागे कोण आहे? आणि ही घटना कशापद्धतीने पुढे घेऊन जायची? यात कोण संबंधित आहेत?  याची चौकशी केली जाईल.

मंत्री नवाब मलिक हे केंद्र सरकारच्या धोरणांवर आवाज उठवत होते. तो आवाज बंद करण्यासाठी जुना मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. ५ वर्षे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना फ़डणवीस यांनी याचा तपास केला असता तर बरे झाले असते. मात्र अन्यायाविरोधात बोलताना एखाद्याला अडकवले जाते आणि त्याच्या विरोधात षडयंत्र केले जाते असे वळसे पाटील म्हणाले.

गृहमंत्र्यांच्या उत्तरानंतर भाजपाने सीबीआयची मागणी लावून धरत सभात्याग केला.

No comments to show.

Leave a Comment