Ads

--

भाजपचा चार राज्यात दणदणीत विजय; पंजाबमध्ये ‘आप’!

By Xtralarge News

March 10, 2022 6:17 pm

Ads

भाजपचा चार राज्यात दणदणीत विजय; पंजाबमध्ये ‘आप’!

नवी दिल्ली, दि. १० मार्च:

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपाची सत्ता कायम राहिली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा मानहानीकारक पराभव करत आम आदमी पक्षीने घवघवशीत यश मिळवले आहे.

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची सत्ता पुन्हा एकदा आपल्याकडेच ठेवण्यात भाजपाला यश आले असून २६९ जागा जिंवत विजयी घौडदौड कायम ठेवली. मागील ३०२ पेक्षा काही जागा कमी झाल्या असल्या तरी सत्ता राखण्यात योगी आदित्यनाथ यांना यश आले आहे. समाजवादी पक्षा १२९ जागांवर विजयी झाला आहे. मागील निडणुकीतील जागांमध्ये मोठी वाढ झाली असली तरी सत्तेत येण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. मायावती यांचा बसपा तिसऱ्या स्थानी तर काँग्रेस चौथ्या स्थानी पोहोचले आहे.

गोव्यात भाजपा दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झाले आहे. बहुमताला एक जागा दोन कमी असल्या तरी सत्ता स्थापनेत भाजपाला फारशी अडचण येईल असे वाटत नाही. गोव्यात भाजपाला २० तर काँग्रेसला ११ जागांवर विजय मिळवता आला.

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. काँग्रेसचे मुख्यमंत्री चन्नी दोन्ही मतदार संघातून पराभूत झाले तर नवज्योतसिंग सिद्धू व माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग हे सुद्धा पराभूत झाले. काँग्रेस फक्त १८ जागावर विजय मिळाला.

उत्तराखंडमध्ये भाजपने ४९ जागांवर विजय मिळला तर काँग्रेस १४ जागांवर मिळवू शकली. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी व काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मणिपूरमध्ये भाजपने विजय मिळवला.

No comments to show.

Leave a Comment