विधानसभा अध्यक्षपदाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

0
high court 11

विधानसभा अध्यक्षपदाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली..

मुंबई, दि. ९ मार्च:

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळत माजी मंत्री व भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांना मुंबई हायकोर्टाने मोठी चपराक दिली. नियमांत दुरुस्ती करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. त्यावर हायकोर्टाने विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ आमदारांच्या प्रश्नी राज्यपाल निर्णय घेत नाहीत हे लोकशाहीचा गळा घोटणे नव्हे का असा प्रतिसवाल केला.

गिरीश महाजन व जनक व्यास यांनी सुनावणी हवी असेल तर १० लाख आणि २ लाख रुपये डिपॉझिट भरा असे कोर्टाने सांगितले होते. आज यावर निकाल देताना हायकोर्टाने याचिका तर फेटाळीच पण डिपॉझिट म्हणून ठेवलेले १२ लाखही जप्त केले.

सध्या राज्यपाल आणि मुख्यमंत्री एकमेकांसोबत नाहीत. त्यांच्यातल्या या वादाने कुणाचे नुकसान होत आहे असा सवालही हायकोर्टाने केला. विधान परिषदेच्या नामनिर्देशित १२ सदस्यांच्या निवडीबाबतचा आदेश देऊन आठ महिने उलटले आहेत पण या आदेशाचाही आदर राखला गेलेला नाही, अशी टिप्पणी कोर्टाने केली.

विधानसभेच्या अध्यक्ष निवडीचे लोकांना काय पडले आहे? इथे बसलेल्या किती जणांना लोकसभेचा अध्यक्ष कोण आहे हे माहित आहे? विधानसभा अध्यक्ष कोण असावा याने जनतेच्या हिताचे कसे उल्लंघन होते ? असे सवाल हायकोर्टाने विचारले. अशा याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका अशी तंबीही हायकोर्टाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *