Ads

--

एसएनडीटी विद्यापीठास 5 कोटी देणार

By Xtralarge News

March 9, 2022 10:52 am

Ads

एसएनडीटी विद्यापीठास 5 कोटी देणार

मुंबई, दि. 9 मार्च:

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विकास कामांसाठी 5 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय यांनी केली. महिला दिनानिमित्त एक प्रकारे त्यांनी एस एन डी टी विद्यापीठास गिफ्ट दिले आहे.

जागतिक महिला दिनिमित्त एस एन डी टी महिला विद्यापीठामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही घोषणा केली. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ उज्वला चक्रदेव, उप कुलगुरू डॉ रुबी ओझा, कुलसचिव डॉ सुभाष वाघमारे, तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ धनराज माने, आहान फोउनडेशनच्या प्रमुख सोनाली पाटणकर आदी मान्यवर उपस्थीत होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, एस एन डी टी विद्यापीठाने रत्नागिरीमध्ये महिलांसाठी महाविद्यालय स्थापन करण्याची अपेक्षा कुलगुरू यांच्याकडे केली. आजची नारी हि अबला नाही तर  सबला आहे. राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित चरित्रे आजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी वाचली पाहिजेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विद्यापीठ परिसर हा लैंगिक अत्याचार मुक्त असला पाहिजे, लैंगिक अत्याचार विरोधात तक्रारी आल्यास स्वतः जातीनं लक्ष घालणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

एस एन डी टी हे आशिया खंडातील पहिले महिला महाविद्यालय आहे. देशातील सात राज्यात विद्यापीठाची व्याप्ती आहे. बाहेरील राज्यात गेल्यास विद्यापीठाची मदत होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या  सक्षम करण्यासाठी वयाची अट लागू नसते त्याससाठी त्यांनी समाजातील यशस्वी  महिलांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यापीठाच्या चर्चगेट जवळील आवारात वृक्षारोपण केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन मंत्री महोदयांनी केले.

No comments to show.

Leave a Comment