महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे फडणवीसांचे भयंकर गौप्यस्फोट

0
dev f

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे फडणवीसांचे भयंकर गौप्यस्फोट..

शरद पवार, गृहमंत्री ते महाराष्ट्र पोलीसांवर स्फोटक आरोप…

मुंबई, दि. ८ मार्च

माजी मंत्री व भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, पोलीस अधिकारी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असणारा पेनड्राईव्ह दिला.

देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर आरोप करताना म्हणाले की, महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे पण अलिकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सरकाकडून वाढला आहे. सरकारच षड्यंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही.

गिरीश महाजन यांच्याविरोधात बनावट केस तयार करून मोक्का लावण्यात यावा असे सांगून कागदपत्रे तयार करण्यात आली. विरोधकांची कत्तल कशी करायची यासाठी षड्यंत्र शिजत होते. या कथेमध्ये प्रमुख पात्र विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण हे होते. गिरीश महाजन यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणातही सरकारी वकील हेच आहेत. या वकिलांचे कार्यालय आहे की महाविकास आघाडी सरकारचा राजकीय कत्तलखाना अशी स्थिती आहे. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जचा धंदा कसा दाखवायचा, रेड कशी टाकायची आणि कसेही करुन ही केस मोक्कामध्ये कशी फिट बसेल याचे नियोजन एक सरकारी वकील करतो याची ही कथा आहे.

संजय पांडे यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती कोणत्या बोलीवर करण्यात आली आहे? यासंदर्भात संभाषण असल्याचा गौप्यस्फोट करत ते संभाषण फडणवीस यांनी वाचून दाखवले, पवारसाहेब तयार आहेत, जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे, आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले आहे. मी रजिस्टर करायला लावतो असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्र परिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल. भाजपाला १० कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये खूप पैसे कमावले. १०० कोटींपेक्षा जास्त..कदाचित अडीचशे कोटी तरी असतील. अनिल देशमुख आपल्या कामी आला असता. अनिल देशमुख गेल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. वळसे काहीच करत नाहीत, असे संभाषण असलेल्या एका क्लिपमधले संवाद फडणवीसांनी वाचून दाखवले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *