राज्यात सध्या सुडाचे राजकारण !
राज्यात सध्या सुडाचे राजकारण !
करमाळा, दि. २३ फेब्रुवारी :
महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते मात्र सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथे व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले की, सध्या राज्यात चुकीचे वातावरण फोफावत आहे, राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कारण नसताना ईडीने अटक केली आहे.
कोणत्याही प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडायचे यासाठी राज्यातील काही जण कार्यरत आहेत. कोणताही संबंध नसताना, कोणतं कारण नसताना, कोणतीही माहिती न देता केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन धाडसत्र…अटकसत्र राबवले जात आहे. हे काही योग्य वाटत नाही.
दबावतंत्राचे राजकारण केले जात असून २०१९ च्या काळात भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावरही दबावतंत्र वापरले गेले. आज आपला पक्ष सत्तेत आहे. आपणही कोणत्याही दबावाखाली न येता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार यांचे विचार मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी काम करा, आपल्या बुथ कमिट्या ताकदवान करा.
