संजय राऊतांच्या रडावर आता थेट ईडी !
संजय राऊतांच्या रडावर आता थेट ईडी !
मुंबई, दि. १९ फेब्रुवारी:
भाजपा खासदार किरिट सोमय्या यांना अंगावर घ्यायची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एका आरोपाचा बॉम्ब फोडून थेट आव्हान दिले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तोफ डागली तसेच ईडीच्या मोठा घोटाळा पुढच्या आठवड्यात जाहीर करण्याचा इशाराही दिला.
संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्या यांचा पालघरमधील वेवूर नावाच्या गावात त्यांचा २६० कोटी रुपयांचा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प सोमय्या यांच्या मुलाच्या नावावर असून त्यांची पत्नी मेधा सोमय्या त्या प्रकल्पावर संचालक आहेत. या २६० कोटींमध्ये ईडीचे एक संचालक आहेत, त्यांचे किती पैसे आहेत हे मी विचारले. ही बेनामी मालमत्ता ईडीच्या एका संचालकाची आहे. हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून?
आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावा आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही कितीही धमक्या दिल्या तरी, रिश्ते में हम आपके बाप लगते है, बाप काय असतो, हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल. पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा बाहेर काढणार असा इशारा राऊत यांनी दिला.
