बेस्टच्या ९०० ई-बस कंत्राटात घोटाळा !

0
Ebus m

बेस्टच्या ९०० ई-बस कंत्राटात घोटाळा !

मुंबई, १८ फेब्रुवारी :

भारतीय जनता पक्षाने शिवसेनावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला आहे. बेस्टसाठी २०० ई बसेसची निविदा काढली असताना ती ४०० व नंतर ९०० बसची कशी झाली? मुळात ९०० इ बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की कॅासेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? असा सवाल भाजपा आमदार मिहिर कोटेचा यांनी उपस्थित केला आहे.

ई बस खरेदी प्रकरणावर बोलताना मिहिर कोटेचा म्हणाले की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी दिला पण त्याच्यावर डल्ला विशिष्ट ठेकेदाराच्या भल्यासाठी मारला जात आहे. निविदा २०० इ बसेसची निघते ती नंतर ४०० ची केली जाते आणि मंजूरी मिळेपर्यंत कुठलीही पुनर्निविदा न काढता ती ९०० बसची होते.

वास्तविक ९०० दुमजली बसेस मुंबईच्या रस्त्यावर खरोखर धावू शकतील का? याचा कधी फिजीबीलीटी रिपोर्ट घेतला आहे का? किंबहूना ही खरेदी फक्त कागदावरतीच करायचा हेतू तर नाही ना? या कंपनीचे भागभांडवल फक्त एक लाख रूपये आहे त्यांना तुम्ही २८०० कोटीचे कंत्राट कोणत्या आधारावर व कोणत्या हेतूसाठी देत आहात?  याची आम्ही मुंबईकरांसमोर पोलखोल करणार. २८०० कोटींच्या घोटाळ्याबाबत आम्ही कॅग आणि न्यायालयात दाद मागणार आहोत. मुंबईकरांचा मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क तुमच्या घोटाळ्याने हिरावू देणार नाही असेही कोटेचा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *