Ads

-

मोदी सरकार आल्यानंतर गोडसे महिमा वाढला

By Xtralarge News

February 17, 2022 10:20 am

Ads

मोदी सरकार आल्यानंतर गोडसे महिमा वाढला

मुंबई दि. 17 फेब्रुवारी :
गोडसेनीतीचा महिमा वाढवणे…त्याच्या विचारांना प्रोत्साहन देणे हे मोदी सरकार आल्यानंतर देशभरात हळूहळू वाढत चालले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, गुजरातमध्ये नथुराम गोडसे माझा नायक हा विषय समोर येत असेल तर ते योग्य नाही. आठ वर्षात गोडसेचा महिमामंडळ जोरात सुरू आहे ही सत्य परिस्थिती आहे. महात्मा गांधी यांचे नाव घेऊन नुसते कार्यक्रम करायचे. महात्मा गांधी यांचे नाव घेतले नाही तर जग आणि देशभरात राजकारण करता येत नाही हे मोदींना मान्य आहे.

No comments to show.

Leave a Comment