Ads

---

फडणवीस, सोमय्या, मुनगंटीवारांवर गंभीर आरोपाचा धमाका

By Xtralarge News

February 15, 2022 8:51 pm

Ads

फडणवीस, सोमय्या, मुनगंटीवारांवर गंभीर आरोपाचा धमाका.

सोमय्यांचा मुलगा PMC bank घोटाळ्याच्या मास्टर माइंडचा भागीदार.

मुंबई, दि. 15 फेब्रुवारी:
शिवसेने खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप करण्यात आले. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, किरिट सोमय्या, त्यांच्या मुलगा निल सोमय्या व मोहित कुंभोज यांच्यावर संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून राज्याच्या राजकारणात एकच धमाका केला.

पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध असून त्यांचा मुलगा नील या मास्टर माइंडच्या कंपनीत भागिदार आहे. सोमय्यांच्या मुलाचे निकॉन फेज वन आणि टू असे हजारो कोटींचे प्रकल्प वसईत उभे आहेत. या प्रकल्पात पीएमसी बँकेतील घोटाळ्याचा पैसा आहे असा आरोप करत सोमय्या पिता पुत्रांना अटक करा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

किरीट सोमय्या ही एक फ्रॉड व्यक्ती आहे. त्यांनी बँक घोटाळा करत लोकांचे पैसे बुडवले आहेत. निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी किरीट सोमय्यांची आहे, ही कंपनी नील सोमय्यांची आहे व नील सोमय्या हे पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवानचा पार्टनर आहे असा दावाही राऊत यांनी केला. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन असून त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत.

मुंबईच्या 70 बिल्डराकडून ईडी आणि दलालाकडून वसूली केली जात आहे. 70 बिल्डराकडून किमान 300 कोटी वसूल केले आहेत. यात ईडीचे काही अधिकारी सहभागी आहेत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. देवेंड फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटी रुपयांचा महाआयटी घोटाळा झाल्याचा आरोप करून मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन आहे तो फडणवीसांना डुबवणार आहे.

पत्राचाळ जमिनीत कंबोजचा पैसा असून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवानकडून केबीजी ग्रुपनं 12 हजार कोटींची जागा 100 कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपकडे आहेत. त्यासाठीचा पैसे कुठून आला याची माहिती फडणवीसांना माहिती आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

No comments to show.

Leave a Comment