सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारा द्रष्टा उद्योगपती काळाच्या पडद्याआड !

0
IMG_20220212_155155

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारा द्रष्टा उद्योगपती काळाच्या पडद्याआड !

राहुल बजाज यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची श्रद्धांजली

मुंबई, १२ फेब्रुवारी:

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशातील सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारे व आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने बजाज उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर पोहचवणारे द्रष्टे उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेले आहेत अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

राहुल बजाज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून नाना पटोले म्हणाले की, देशाच्या स्वातंलढ्यापासून औद्योगिक विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणा-या बजाज कुटुंबाचा वारसा राहुल बजाज यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळला. बजाज ऑटोला यशाच्या शिखरावर पोहोचवून त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान देत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केले. औद्योगीक क्षेत्रासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. राज्यसभेत खासदार म्हणून त्यांनी उद्योगाच्या आणि सामाजिक प्रश्नांवर नेहमी स्पष्ट व परखड भूमिका मांडली. त्यांच्या निधनाने औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही बजाज कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *