Ads

--

लतादीदीच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाचा वाद थांबवा !

By Xtralarge News

February 11, 2022 3:59 pm

Ads

लतादीदीच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाचा वाद थांबवा !

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी:

लतादीदीचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे ही आमची इच्छा नाही. राजकीय लोकांनीही दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा, असे आवाहन ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केले आहे.

गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरु असताना त्यावर मंगेशकर कुटुंबाने भाष्य केले आहे. यामुद्द्यावर बोलताना ह्रदयनाथ मंगशेकर म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचे काहीही कारण नाही. कारण दीदीचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे ही आमची इच्छाच नाही. शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून राजकारणी लोकांचा जो वाद चालला आहे तो त्यांनी कृपया बंद करावा. दीदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये.

महाराष्ट्र शासनाने दीदीला लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापने करण्याचे आश्वासन दिले होते. स्वतः लता मंगेशकरांनी त्यांना त्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही मागणी अतिशय आनंदाने मान्य केली होती. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केली आहे. दीदीचे संगीत स्मारक होतेय यापेक्षा अन्य कुठलेही मोठे स्मारक होऊ शकत नाही, असेही ह्रदयनाथ म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment