Ads

--

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस !

By Xtralarge News

February 10, 2022 10:08 am

Ads

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस !

ठाणे, दि. 10 फेब्रुवारी :
शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वाढदिवस ठाणे शहरातील बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र असलेल्या ‘स्वयंम’ संस्थेत जाऊन विशेष मुलांसोबत साजरा केला. या मुलांसोबत केक कापून त्यांनी मुलांना केक भरवला.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की,माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक केक कापले, इथे येता येता गाडीत बसूनही कापले पण याठिकाणी येऊन या मुलांसोबत कापलेल्या केकची गोडी वेगळीच आहे. या विशेष मुलांची काळजी घेणे, त्यांना सांभाळणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे काम सोपे नाही. या कामासाठी अत्यंत चिकाटी आणि समर्पणाची भावना लागते. या मुलांना निसर्गाने काही गोष्टी दिल्या नाहीत मात्र त्यांच्यात काही कलागुण नक्की असतात हे कलागुण शोधून त्यांना वाव देणे हे अशा संस्थांचे काम असते. ते काम स्वयंम गेली 16 वर्षांपासून अव्याहतपणे करत आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. या मुलांना हाताळण्याचे प्रशिक्षण देणेही गरजेचे असते. या संस्थेच्या माध्यमातून हे काम होत असल्याचे विशेष समाधान वाटते. समजात विशेष मुलांची संख्या मोठी असून त्यांना सांभाळणाऱ्या अशा संस्थांची गरज आहे.

स्वयम संस्थेने तयार कलेल्या ‘भरारी आत्मविश्वासाची’..
या विशेष पुस्तिकेचे अनावरण मंत्री शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. या पुस्तिकेसोबतच मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि योगाचार्य अण्णा व्यवहारे यासारख्या मान्यवर तज्ज्ञांनी या मुलांचं पालकत्व कसं निभावून न्यावं याबाबतचे मार्गदर्शन करणाऱ्या पाच सीडींच्या संचाचे प्रकाशन देखील करण्यात आले. ही पुस्तिका आणि सिडीच्या माध्यमातून जी मुले आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे कोणत्याही संस्थेत अथवा शाळेत दाखल होऊ शकत नाहीत त्यांना कशारीतीने सांभाळावे, त्यांना कसे हाताळावे त्याच्याशी वागाता बोलताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment