शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळे सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत

0
dada bjp

शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळे सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत..

पुणे, दि. ५ फेब्रुवारी:

भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली, यात ते किरकोळ जखमी झाले. यावरून भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत. आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि आम्ही कायदेशीरपणेच पण जशास तसे उत्तर दिले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *