… आता थेट मुख्यमंत्री ठाकरेंवरच गंभीर आरोप !
… आता थेट मुख्यमंत्री ठाकरेंवरच गंभीर आरोप!
मुंबई, दि. ३ फेब्रवारी;
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेला पोलीस खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव होता असा खळबळजनक जबाब परमविर सिंह यांनी ईडीसमोर दिला आहे.
पोलीस बदल्यांमध्ये याद्या तयार करण्यात आल्यानंतर फक्त नावासाठी याद्या समितीसमोर येत होत्या. मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या याद्याही गृह मंत्रालयातून येत होत्या. यातील काही याद्या परमबीरसिंह यांनी ईडीला दिल्या आहेत. या याद्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असाही आरोप सिंह यांनी केला.
सचिन वाझेला पोलीस दलात घेण्यासाठी आणि त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता. पोलीस खात्यात परतण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली असे सचिन वाझेने सांगितले होते असा परमविरसिंह यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. वाझे हा थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना त्याच्याकडील गुन्ह्यांची माहिती देत होता. वाझे याच्यावर कारागृहात आणि चौकशीवेळी त्याने दिलेले जबाब बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे असा दावाही परमविरसिंह यांनी जबाबात केला आहे.
