Ads

-

मोदी सरकारकडून महाराष्ट्राला मदत होत नाही !

By Xtralarge News

January 30, 2022 2:40 pm

Ads

मोदी सरकारकडून महाराष्ट्राला मदत होत नाही !

मुंबई, दि. ३० जानेवारी:

डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला जशी मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्राला व देशातल्या कोणत्याच राज्याला मिळत नाहीत. त्यामध्ये बर्‍याच कमतरता व तुटवडा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधी पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्यामध्ये केंद्राचा आणि राज्यात एकूण केंद्राचा मोठा हिस्सा असायला हवा मात्र सध्या काही तसे दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून देशाची अर्थव्यवस्था चालवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तोटा मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांच्या खिशाला बसत आहे. इंधनावरील कर कमी करणे, आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे इंधन उपलब्ध करून देणे हे मोदी सरकारने काम केले तर त्यांचे कौतुक होऊ शकते मात्र एक तारखेचे बजेट उत्तरप्रदेश आणि पंजाब या निवडणुका समोर ठेवून जाहीर केले जाईल आणि जे शेतकरी मधल्या काळात विरोधात गेले आहेत त्यांना भाजप चुचकारण्याचा प्रयत्न करेल.

No comments to show.

Leave a Comment