Ads

--

‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ नावावरून मुंबईत राडा !

By Xtralarge News

January 26, 2022 11:03 pm

Ads

‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ नावावरून मुंबईत राडा !

चारकोप पोलिस स्टेशन बाहेर भाजपाचे ठिय्या आंदोलन..

मुंबई, दि. २६ जानेवारी:

मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या क्रीडा मैदानाच्या ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ या नावावरुन मोठा राडा झाला. भाजपाने या नावाला विरोध करत चारकोप पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. छत्रपतीच्या राज्यात टिपू सुलतानचे नाव क्रीडासंकुलनाला देणं ही दुर्दैवी बाब आहे. जोपर्यंत हे नामकारण बेकायदेशीर आहे असं महाविकास आघाडी सरकार सांगत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेऊ असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी दिला.

मालाड-मालवणी येथील या क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचा घाट महविकास आघाडी सरकारने घातला आहे. याचा मुंबई भाजपा कडून वारंवार निषेध करून देखील झोपलेल्या सरकारला जाग आली नाही. झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यावी यासाठी मंगळवारी रात्री मुंबई भाजपाकडून आंदोलन करण्यात आले तरी देखील सरकारने कोणतेही दखल घेतली नाही. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्याकरीता मुंबई भाजपा तर्फे चारकोप पोलिस स्टेशन बाहेर ठीय्या आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई भाजप कार्यकर्त्यांकडून चारकोप पोलिस स्टेशनबाहेर जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे.

यावेळी बोलताना लोढा म्हणाले की, मुंबईसह राज्यभरात मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहेत. मालाड-मालवणी भागात मागील अनेक वर्षांपासून स्थानिक हिंदूंना हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे.मालाड मालवणी परिसरामध्ये टिपू सुलतानच्या नावाचे बोर्ड कसे काय लागले ? असा सवाल लोढा यांनी उपस्थित केला.

आंदोलनात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाल शेट्टी, मुंबई भाजपा उपाध्यक्ष पवन त्रिपाठी तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

No comments to show.

Leave a Comment