Ads

--

सोमय्यांना फाईल दाखवणे ‘त्या’ अधिकाऱ्याला भोवणार!

By Xtralarge News

January 25, 2022 3:15 pm

Ads

सोमय्यांना फाईल दाखवणे ‘त्या’ अधिकाऱ्याला भोवणार!

मुंबई, दि. २५ जानेवारी:

भाजपाचे नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांना मंत्रालयात फाईल दाखवणाऱ्या नगरविकास खात्यातील अधिकाऱ्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांला निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

नगरविकास खात्यात किरीट सोमय्या खुर्चीवर बसलेले असून त्यांच्यासमोर अधिकारी मात्र उभे असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री ठाकरे यांनी गंभीरपणे घेत त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असे समजते.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने यावर गंभीर आक्षेप घेतला होता. काँग्रेस नेते सचिन सावंत यावर बोलताना म्हणाले की, किरीट सोमय्या ज्या पद्धतीने नगरविकास खात्याच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे. जर त्यांनी आरटीआय अंतर्गत परवानगी घेतली नसेल तर हा गुन्हा आहे, म्हणूनच चौकशी व्हावी. जर गुन्हा घडल्याचे सिद्ध झाला तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नगरविकास खात्याने हे तपासून पहावे, फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात. जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही.

No comments to show.

Leave a Comment