Ads

--

राष्ट्रवादी काँग्रेस UP , गोवा व मणिपूरमध्ये निवडणूक लढवणार

By Xtralarge News

January 11, 2022 5:32 pm

Ads

राष्ट्रवादी काँग्रेस UP , गोवा व मणिपूरमध्ये निवडणूक लढवणार

मुंबई, दि. ११ जानेवारी :

देशातील पाच राज्यात निवडणूका जाहीर झाल्या असून मणीपूर, गोवा आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूका लढवणार आहे. या तिन्ही राज्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि छोट्या मोठ्या पक्षांना बरोबर घेऊन आघाडी करून लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

शरद पवार म्हणाले की, मणीपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत त्यामुळे यावेळी पाच जागा राष्ट्रवादी लढणार आहे तर गोव्यामध्ये कॉंग्रेस, तृणमूल व इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या आठवड्यात स्वतः जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर काही पक्षांची आघाडी झाली आहे. लखनऊमध्ये या सर्व पक्षांची बैठक होणार असून त्या बैठकीत जागा वाटपाची घोषणा करण्यात येईल.

उत्तर प्रदेशमध्ये लोकांना बदल हवा आहे त्यामुळे तिथे परिवर्तन होईल. आमच्याबाजुने ८० टक्के लोक आहेत तर २० टक्के लोक नाहीत असे विधान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री हा सर्वांचा असतो. २० टक्के लोक बाजुने नाहीत हे विधान अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनांना छेद देणारे आहे. अशा प्रकारचे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभा देणारे नाही. पण त्यांच्या जे मनात आहे, ते त्यांच्या ओठावर आले आहे. यातून एक गोष्ट सिद्ध होते की, देशात एकता आणि सहिष्णुता टिकवायची असेल तर अशाप्रकारचे सांप्रदायिक विचार वाढणे योग्य नाही. याविरोधात उत्तर प्रदेशची जनता नक्कीच कौल देईल आणि राज्यात परिवर्तन घडवेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे अशी आमची इच्छा आहे. माझ्या पक्षाकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे असेही पवार म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment