मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत !

0
BSP 22

मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत !

लखनऊ, दि. ११ जानेवारी:

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष ताकदीने मैदानात उतरत असताना मायावती यांनी मात्र धक्कादायक निर्णय घेतला आहे. बसपा पक्षप्रमुख मायावती यावेळची विधानसभा निवडणूक लढणार नाहीत अशी माहिती बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीबाबत पक्षपातळीवर झालेल्या निर्णयांची माहिती देताना सतिशचंद्र मिश्रा म्हणाले की,  मायावती स्वत: निवडणूक लढणार नाहीत तसेच माझ्यासह माझी पत्नी कल्पना मिश्रा, माझा मुलगा कपिल मिश्रा तसेच मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद या सर्वांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मायावती प्रचारसभा मात्र घेणार आहेत.

उत्तर प्रदेशात भाजप किंवा समाजवादी पक्ष नाही तर यावेळी बसपाची सत्ता येणार आहे. समाजवादी पक्षाने ४०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे पण ज्यांना ४०० उमेदवार मिळू शकत नाहीत ते ४०० जागा कशा जिंकणार, असा सवाल मिश्रा यांनी केला आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४०३ पैकी ३१२ जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली होती. समाजवादी पक्षाला ४७, काँग्रेसला ७ तर बसपाने फक्त १९ जागा जिंकल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *