मोदींच्या दीर्घायुष्यासाठी मुंबादेवीला प्रार्थना !

0
IMG-20220106-WA0127

मोदींच्या दीर्घायुष्यासाठी मुंबादेवीला प्रार्थना !

मुंबई, ६ जानेवारी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये एका जीवघेण्या संकटातून सुखरूप बचावल्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबादेवीचे दर्शन घेतले.

चंद्रकांत पाटील यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाड्यांचा ताफा बुधवारी पंजाबमध्ये एक फ्लायओव्हरवर अडकला तेथून पाकिस्तानची सीमा केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधान फ्लायओव्हरवर वीस मिनिटे होते. त्यावेळी कोठूनही हल्ला होण्याचा धोका होता. पंजाबमधील काँग्रेस सरकारमुळे हे संकट ओढवले पण मोदी सुखरूप वाचले. त्याबद्दल देवाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि मोदीजींना दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना करण्यासाठी मुंबादेवीचे दर्शन घेतले.

नरेंद्र मोदी यांना दीर्घ आयुष्य मिळो, त्यांचे आरोग्य चांगले राहो आणि त्यांच्या हातून अशीच देशाची सेवा घडो यासाठी जगभरातील भारतीयांनी प्रार्थना केली. देशभरातील भारतीयांनी इष्टदेवतेचे ऋण व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *