Ads

--

विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही

By Xtralarge News

January 4, 2022 4:51 pm

Ads

विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही.

मुंबई, दि . ४ जानेवारी:

विद्येच्या मंदिरात म्हणजेच विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप करू देणार नाही. विद्यापीठ कायदा २०१६ बदलाचा निर्णय मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकाराला दिला.

मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ कायदा २०१६ बदलाचा निषेध करण्याकरीता आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

लोढा म्हणाले की,  महाराष्ट्र सरकारने नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विद्यापीठ कायदा २०१६ बदलाचे विधेयक कोणतीही चर्चा न करता घाई गडबडीत मंजूर केले. यात प्रामुख्याने विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती राज्य शासन करणार आहे. तसेच कुलपतीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने प्र. कुलपती या नवीन पदाची निर्मिती केलेली आहे. या पदावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत. त्यामुळे विद्येच्या मंदिरात म्हणजेच विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप नकळतपणे वाढणार असून हे मुंबई भाजप तसेच विद्यार्थी आघाडी खपवून घेणार नाही.

यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा तसेच भाजपा विद्यार्थी आघाडी संघटनेचे मुंबई अध्यक्ष सुजय चोकसी आणि भाजपा युवा दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप उपस्थित होते. त्याच बरोबर मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

No comments to show.

Leave a Comment