Pednekar-2

…तर मुंबईत लॉकडाउन लागू करणार !

मुंबई, दि ४ जानेवारी :

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णवाढीचा वेग पाहता लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा जास्त झाली तर मात्र मुंबईत लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

महापौर पेडणेकर म्हणाल्या की, आता कुठेतरी सगळेजण सावरत आहेत आणि पुन्हा जर लॉकडाउनचे सावट निर्माण झाले तर सगळ्यांचे कंबरडे मोडेल. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन केले, योग्य ती काळजी घेतली आणि सर्वजण जबाबदारीने वागले तर लॉकडाउन होणार नाही. पण दररोजच्या रूग्णसंख्येने २० हजारांचा आकाडा ओलांडला तर मात्र केंद्र सरकारने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महानगरपालिका या नियमांची पूर्तता करेल. मुख्यमंत्री एक-दोन दिवसांमध्ये कोरोना परिस्थितीवर बोलू शकतात.

मुंबईत सोमवारी एकाच दिवसात ८०८२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एप्रिलनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या २९ हजार ८२९ इतकी आहे. तसेच मुंबई शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर १३८ दिवस आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने निर्बंध कठोर करण्यात येत आहेत. पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *