मोदीजी, मौन सोडा आणि चीनला उत्तर द्या !
मोदीजी, मौन सोडा आणि चीनला उत्तर द्या !
नवी दिल्ली, ३ जानेवारी:
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीनने गलवान खोऱ्यात चिनी ध्वज फडकवल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. चीनच्या या कृतीनंतर केंद्रातील मोदी सरकार चौफेर टीका होत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. गलवानवर आपला तिरंगा चांगला दिसतो. चीनला उत्तर द्यावे लागेल. मोदीजी, मौन सोडा!, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
चीनने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हा ध्वज खास आहे कारण तो एकदा बीजिंगच्या तियानमेन स्क्वेअरवर फडकला होता असे म्हटले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये भारत आणि चीनने चकमकीच्या ठिकाणापासून दोन किमी अंतर मागे जाण्याचे मान्य केले होते. गलवान चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते.
सीमेवर चीनने घुसखोरी करण्याचे प्रकार वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी वारंवार टीका केली आहे. चीनला लाल डोळे करुन दाखवा असेही राहुल गांधी यांनी आव्हान दिले होते.
